मंगळवार, १ मे, २०१८

गरुडाचा पुनर्जन्म

गरुडाचा पुनर्जन्म

गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.

त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे !

जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर, गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो.
एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !

150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !

याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात.  आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !

150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील !

दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे
एकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची
हनुमंत खाडे
9665656592

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

नवी ओळख नवा ध्यास

राम कृष्ण हरी विठ्ठल

भिकारी आणि व्यापारी.
–––––––
एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भिक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला.

त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भिक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भिक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भिक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, "तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?" तेव्हा तो भिकारी म्हणाला, "शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?"

"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला भिक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे.
भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन." शेटजी उत्तरले.
इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे.

मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भिक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?

बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भिक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे?

जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.

विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.

तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.

कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे.

तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भिक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, "शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन." शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले,
"व्वा! क्या बात है?
आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास." एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य,
आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास,
त्याच्या मनात घर करून गेलं.
तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.

विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, "नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो." आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.

साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, "ओळखलंत मला?

आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, "नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत."

पहिला : "नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत."

दुसरा : "असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?"
पहिला माणूस हसून उत्तरला, "ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?" आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय. पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं कांहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे.

मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात.
आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय."

भारतीय ऋषीमुनींनी बहुधा ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून देण्यावर नेहेमीच जोर दिलेला आहे.

शेवटी सगळं कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यन्त तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला तेव्हा तो खरंच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला आपण कोण आहोत हे समजायला लागू तेव्हा मग
आणखी समजण्यासारखं राहिलंच काय?
होय ना?

*****
हनुमंत अर्जुन खाडे
    ९६६५६५६५९२

बुधवार, १० जानेवारी, २०१८

जीवनात यशस्वी होण्यासाठी गरुडाचे हे 7 गुणधर्म जरूर अनुसरा

गरुडाचे हे 7 गुणधर्म गरुडाला साखळी मध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर घेऊन जातात

गरुड हा एक शिकारी पक्षी म्हणून ओळखला जातो. रॅक्टर्स प्रकारात येणारा हा पक्षी शिकार करतो. गरुड आपणास सर्वाना त्याच्या बद्दल असलेल्या अनेक प्राचीन घटनांशी संबंधामुळे परिचित आहे. सहसा गरुड हे साप, इतर छोटे पक्षी, मासे, छोटे मोठे सस्तन प्राणी यांची शिकार करतात. केवळ गिधाड हा पक्षीच गरूडापेक्षा मोठा असतो. गरुडाविषयी आपन आज अशा गोष्टी जाणून घेऊया ज्या साखळी मध्ये त्याला सगळ्यात वरच्या स्थानावर घेऊन जातात…

1) गरुड कधीही कळप किंवा थव्या मध्ये राहत नाही. तो बाकीच्या पक्ष्यांमध्ये कधीही मिक्स होत नाही. गरुड कायम एकटे उंच आकाशात उडते जिथं बाकीच्या पक्ष्यांना उडणे तर सोडा साधे पोहचता सुद्धा येत नाही.

2) गरुडाची दूरदृष्टी आणि बुद्धिदृष्टी प्रचंड दूरची असते. दुरूनच कोण शत्रू किंवा कोण भक्ष आहे हे भेदण्याची दृष्टी गरूडमध्ये असते.

3) गरुडाला वादळे आवडतात. ज्या वादळात बाकीचे पक्षी शांत झाडावर बसतात किंवा कुठे तरी आसरा घेतात त्याच वादळात गरुड उंच झेप घेऊन त्या वादळांना जणू आव्हान देत असते.

4) सगळ्यात महत्वाचे म्हणजे गरुड दुसर्याने फेकलेले तुकडे किंवा आधीच मेलेलं भक्ष कधीही खात नाही गरुडाचा स्वतःवर एवढा विश्वास असतो की तो स्वतःचे पोट किंवा स्वतःची प्रगती दुसऱ्याच्या तुकड्यावर कधीही भरत नाही.

5) गरुडाचे वैशिष्ठ म्हणजे तो आपला जोडीदार खरच योग्य आहे का नाही याची परीक्षा घेऊनच विश्वास ठेवतो.

6) गरुड स्वतःच्या मुलांना ही अश्याच पद्धतीने तयार करतो की ते कोणतेही आव्हान सहज पार करू शकतील परंतु फुकटेगिरी कधीही शिकवत नाही.

7) शेवटचे पण फार महत्वाचे जेव्हा गरुडाच्या पंखातील बळ कमी होते तेव्हा ते फार उंच टोकावरील पर्वतात आसरा घेऊन स्वताःचे पंख स्वतःच चोचेने उखडून फाडून काढतोे आणि नवीन पंख येण्याची वाट पाहतो.

एकदा का नवीन पंख परत आले की परत तोच दरारा घेऊन उंच उंच आकाशात भरारी मारतो.
परंतु या काळात तो कोणावरही अवलंबून राहत नाही किंवा जिवंत राहण्यासाठी कुणाचीही याचना करत नाही.

याच वैशिष्टये मुळे गरुड अन्नसाखळी मध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर राहते. जीवनात उच्च स्थान प्राप्त झालेल्या व्यक्तीही अश्याच प्रकारे गरुडाचे गुणधर्म पाळत आलेले असतात म्हणून ते त्या मानवी जीवनात उच्च स्थानावर विराजमान असतात.

हनुमंत खाडे

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

जीवन बदलवणारे विचार

ही सात कठोर वाक्ये तुम्हाला दुखावतील – पण खंबीर बनवतील!
        १ – जगात कुणीच आणि कधीच “खूप व्यस्त” नसतं
     तरुण तरुणींचा टिपिकल प्रॉब्लम – एखाद्या मुलाने मुलीने तुमच्याशी बोलावं म्हणून आटापिटा करत असता. किंवा – तुम्ही ज्यांच्याकडे नोकरीसाठी येरझाऱ्या मारताय, त्यांनी तुमच्या मेलला उत्तर द्यावं म्हणून वाट बघत असता. तुमच्या आयुष्यातील काही मित्र परिवार जो तुम्ही आपणहून सुरु केलेल्या संभाषणाला दाद देत नाही. ही सगळी मंडळी इतके व्यस्त नक्कीच नसतात जेणेकरून तुम्हाला उत्तर देता येणार नाही.
        तात्पर्य एवढंच – की अश्या लोकांना कितपत किंमत द्यायची हे ठरवा आणि किंवा ते तुमच्यात इंटरेस्टेड नाहीत हे ओळखा. ह्या माणसांना दूर सारून चांगल्या माणसांसाठी तुमच्या आसपास जागा बनवा.
        २ – सगळे स्वार्थी असतात!
         ह्या जगात कोणीही संपूर्ण निस्वार्थी नाही. प्रत्येकाला आपले स्वार्थ प्रिय असतात. अगदी तुमचा बॉस – ज्याने त्याच्या वाट्याची कामं तुमच्यावर सोपवण्याचा सपाटा लावलाय, पासून ते तुम्हाला जिवलग मित्र म्हणणाऱ्या पण काम झाल्यावर ओळख न दाखवणाऱ्या मित्रपरीवारापर्यंत सगळे स्वार्थी असतात. प्रत्येक जण तुमच्याकडून जेवढं जमेल तेवढं काम काढून घेण्याच्या प्रयत्नात असतो. शेवटी तुम्हाला कुणाच्या स्वार्थाला बळी पडायचं हे तुम्हीच ठरवू शकता.
           स्वतःच्या कामाला महत्वं द्या. यशस्वी माणसे “नाही” म्हणण्याची हिम्मत ठेवतात. तुमच्या दयाळूपणाला, समाजसेवेला आणि मदतनीस स्वभावाला कुंपण घाला. लोकांना तुमचा वापर करून घेऊ देऊ नका. शेवटी मदत करणे आणि वापर करून घेणे ह्यातला फरक कळला पाहिजे.
        ३ – सगळ्यांना खुश ठेवणं – अशक्य
       तुम्हाला खूप दिवसांपासुन मित्रांसोबत मुव्हीला जायचं पण तेव्हाच कुणा नातेवाईकाकडे लग्न आहे. तुमचा मित्र तुमची वाट बघतोय पण तुमचा बॉस तुम्हाला मदत मागत आहे. दैनंदिन आयुष्यात ह्या अश्या गोष्टी नेहमी येतात जिथे आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो जिथे कुणाला ना कुणाला दुखवावं लागतं.
        ४ – ह्या जगात तुम्हाला फुकट काहीच मिळणार नाहीये!
      तुमच्यात भरपूर गुण आहेत जसे की वक्तृत्व, नेतृत्व, कला. त्या गुणांना छान पैलू पाडून त्यांचा वापर करून दाखवत नाही, तोवर लोकांना कसे कळणार?
          तुम्हाला नेहमीच दोन पर्याय उपलब्ध असतात. एकतर तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा कमी मिळालं म्हणून रडत बसा किंवा उतरा मैदानात आणि जे हवय ते तुमच्या कलागुणांच्या जोरावर मिळवा.
         ५ – बहाणे? तुम्ही स्वतःला फसवताय!
         नेहमीसारखे तुम्ही कट्ट्यावर बसलात आणि नेहमीचा राग आळवताय, मला हे नाही मिळालं मला ते नाही मिळालं. तुमच्याकडे पैसा, घर, गाडी, साधने नाहीत म्हणून रडत बसता. पण इथे प्रत्येकाजवळ आपल्या अपयशासाठी एक तरी योग्य कारण असतंच आणि ह्या बहाण्यांनी आपण स्वतःला फसवत असतो.
         यशस्वी लोक असा कांगावा करत बसत नाहीत. ते आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढतात, अडचणींवर मात करण्याचे उपाय शोधतात.
          ६ – विचारांपेक्षा कृती महत्वाची!
      तुम्ही घरात बसून मोठमोठ्ठी स्वप्ने बघताय, मोठी उद्दिष्टे ठेवताय. मोठ्या गोष्टींबाबत विचार करणे चूक नाही, उलट मोठ्या ध्येयांसाठी ते पोषकच आहे. पण नुसतं विचार करणे कितपत यश देऊ शकेल?
         त्या सगळ्या आखलेल्या प्लान्सवर काम करण्यासाठी कृती करणे देखील तेवढेच महत्वाचं आहे ना? विचार आणि कृतीला व्यवस्थित गुंफता आलं की यश मिळतं. नाहीतर नुसते विचार वायाच जातात.
       ७ – तुमच्या आयुष्यात जादु करणारे तुम्हीच आहात!
      आपल्याला एक नेहमीच वाटत असतं की काहीतरी जादू होईल आणि सगळं कसं मस्त होईल. आपल्याला एक परफेक्ट जोडीदार मिळेल, नोकरीचा कॉल आपोआप येईल. आयुष्यातल्या अडचणी जादूने संपून जातील आणि आटपाट नगरीसारखं सगळं आलबेल होऊन जाईल.
       पण तसं नसतं. जे लोक पुढे जातात त्यांना हे माहित असतं की, आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर आपल्यालाच करायच्या आहेत. जर काही बदलायचं असेल तर त्यासाठी आपणच झटायला हवं. जे साध्य करायचं ते स्वतःलाच करावं लागणार. कुणी येऊन जादूची काडी फिरवणार नाहीये.
        तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. तुम्ही प्रयत्न जरूर करू शकता पण त्याने तुमचं आयुष्य बेढब, अस्ताव्यस्त आणि त्रासदायक होईल.
        जेव्हा-जेव्हा तुम्हाला हरल्यासारखं वाटायला लागेल, तेव्हा हे परत वाचा! नवी उमेद मिळेल!

रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

पाप आणि कालचक्र

एकदा गंगामैयाला विचारण्यात आले की
तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली
जातात. त्या सर्व पापांचे तू काय करतेस?
           गंगामैया म्हणाली, मी ते पाणी समुद्रात नेऊन
टाकते.
          समुद्राला विचारण्यात आले की, तू त्या
पापांचे काय करतोस?
       समुद्र म्हणाला माझ्याकडून ते पाणी ढग
घेऊन जातात.
        ढगाला विचारले... तू काय करतोस त्या
पापांचे?
ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा
पृथ्वीवरच त्या लोकांच्या लोकांच्या घरावर
नेऊन टाकतो.
लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे
तुम्ही जे करणार, तेच तुम्हाला परत मिळणार.

        म्हणूनच आपले कर्म आपल्या ताब्यात हवे
आणि हो ते चांगलेच हवे.
भगवंत जसे ठेवतील तसेच राहण्याचा प्रयत्न करावा.

समाधानी राहावे. लोकांना त्रास होणार नाही,
असे आपले वागणे असावे.

ठेविलें अनंते तैसेचि राहावे | चित्ती असू
द्यावे समाधान ||

हनुमंत खाडे

भगवंताचे समरण

आपल्या शरीराच्या अगदी लहान भागाला
जरी लागले, तरी आपल्या सबंध देहाला
त्याच्या वेदना होतात.
       त्याचप्रमाणे आपण दिवसाची एक जरी
घटिका भगवंताच्या स्मरणात घालविली
तरी सबंध दिवस आपल्याला त्याची आठवण राहील.
म्हणूनच प्रत्येक दिवस भगवंताचे स्मरण करण्याचा
नियम करावा व तो कटाक्षाने पाळावा.
       दिवसांचेच महिने होतात, महिन्यांचीच
वर्षे होतात आणि वर्षांचेच मिळून आपले आयुष्य
बनलेले असते.
        या दृष्टीने दर दिवशीच्या नियम पालनाने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल
व आयुष्य कृतार्थ होईल...

पैसा बहोत कुछ हैं लेकीन सब कुछ नही

हाल ही मे तीन बुरी खबरों ने देश को हिला दिया......

1. 12000 करोड़ की रेमण्ड कम्पनी का मालिक आज बेटे की बेरुखी के कारण किराये के घर में रह रहा है।

2. अरबपति महिला मुम्बई के पॉश इलाके के अपने करोडो के फ्लैट में पूरी तरह गल कर कंकाल बन गयी...विदेश में बहुत बड़ी नौकरी करने करोड़पति बेटे को पता ही नहीं माँ कब मर गयी।

3. सपने सच कर आई ए एस का पद पाये बक्सर के क्लेक्टर ने तनाव के कारण आत्महत्या की।

...... ये तीन घटनाये बताती है जीवन में पद पैसा प्रतिष्ठा ये सब कुछ काम का नहीं.... यदि आपके जीवन में ख़ुशी संतुष्टी और अपने नहीं है तो कुछ भी मायने नही रखता ....

वरना एक क्लेक्टर को क्या जरुरत थी जो उसे आत्महत्या करना पड़ा।

..खुशियाँ पैसो से नहीं मिलती.. अपनों से मिलती है।

पैसा बहुत कुछ है, लेकिन सब कुछ नही है।

जीवनन आनंद के लिए है, चाहे जो हो, बस मुस्कुराते रहो !!​

यदि आप चिंतित हो, तो खुद को थोड़ा आराम दो,

कुछ आइसक्रीम, चॉकलेट, केक लो...

अंग्रेजी वर्ण हमें सिखाते हैं...

A B C....
​Avoid Boring Company​
​मायूस संगत से दूरी​

D E F...
​Don't Entertain Fools​
​मूर्खों पर समय व्यर्थ मत करो​

G H I....
​Go For High Ideas​
​ऊंचे विचार रखो​

J K L M....
​Just Keep a friend like Me​
​मेरे जैसा मित्र रखो​

N O P...
​Never Overlook the Poor n Suffering​
​गरीब व पीडित को कभी अनदेखा मत करो​

Q R S..
​Quit Reacting to Silly tales​
​मूर्खों को प्रतिक्रिया मत दो​

T U V....
​Tune Urself for ur Victory​
​खुद की जीत सुनिश्चित करो​

W X Y Z....
​We Xpect You to Zoom ahead in life​
​हम आपसे जीवन मे आगे देखने की आशा करते हैं !!​

यदि आपने चाँद को देखा, तो आपने ईश्वर की सुन्दरता देखी...

यदि आपने सूर्य को देखा, तो आपने ईश्वर का बल देखा...

​और यदि आपने आइना देखा तो आपने ईश्वर की सबसे सुंदर रचना देखी।​

​इसलिए स्वयं पर विश्वास रखो !!​

जीवन में हमारा उद्देश्य होना चाहिए...
​9 8 7 6 5 4 3 2 1 0​

9 - गिलास पानी,
8- घंटे नींद,
7- यात्रायें परिवार के साथ,
6- अंकों की आय,
5- दिन हफ्ते में काम,
4- चक्का वाहन,
3- बेडरूम वाला फ्लेट,
2- अच्छे बच्चे,
1- दिलबर,
0- चिंता..!!

​ये सिर्फ  विचार नहीँ,

एक सीख है!!​

हनुमंत खाडे